Friday, June 2, 2023

( IBPS ) आयबीपीएस मार्फत विविध [ Bank ] बँकात विविध पदांच्या 8594 जागा भरणे आहे.


 * इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग कर्मिक सेलेक्शन ( IBPS ) - यांचामार्फत 8594 जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. 


* विविध पदांच्या एकूण 8594 जागा - प्रोबेशनरी ऑफिसर  ( स्केल - |,||,||| ) आणि ऑफिस असिस्टंट ( बहुउद्देशीय कर्मचारी ) पदाच्या जागा भरणे आहे. 


* शैक्षणीक पात्रता :- 

 बहुउद्देशिय कर्मचारी ( OFFICE ASSISTANT ) उमेदवार मान्यताप्राप्त विघापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समकक्ष पदवी उत्तीर्ण आणि स्थानिक भाषेचे ज्ञान तसेच संगणक वापरण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. 


* सहव्यवस्थापक ( ऑफिस स्केल-| ) - उमेदवार मान्यताप्राप्त विघपिठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समकक्ष पदवी उत्तीर्ण तसेच कुशी, फलोत्पादन, वनीकरण, पशुवर्धन, पशुवैघकीय विज्ञान, कुशी अभियांत्रिकी, मत्स्यपालन, कुशी विपणन आणि सहकार्य, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कायदा, अर्थशास्त्र, लेखाकर्म मधून पदवी केलेल्या उमेदवारांना प्राधान्य असेल आणि स्थानिक भाषेचे ज्ञान तसेच संगणक वापरण्याचे ज्ञान असणे आवश्यक. 


व्यवस्थापक ( बँकिंग ऑफिसर  स्केल-|| ) - उमेदवार मान्यताप्राप्त विघपिठाची कोणत्याही शाखेतील पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण किंवा समकक्ष पदवी उत्तीर्ण तसेच बँकिंग, वित्त, विपणन, कुशी, फलोत्पादन, वनीकरण, पशुसंवर्धन, पशुवैघकिय विज्ञान, कुशी अभियांत्रिकी, मत्स्यपालन, कुशी विपणन आणि सहकार्य, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कायदा, अर्थशास्त्र आणि लेखाकर्म मधून पदवी केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.


* विशेतज्ञ अधिकारी ( ऑफिसर स्केल - || ) - उमेदवार मान्यताप्राप्त विघापिठाची इलेक्ट्रॉनिक्स/ कम्युनिकेशन/ संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान शाखेतील पदवी किंवा समकक्ष पदवी उत्तीर्ण किमान 50% गुणांसह उत्तीर्णसह ASP, PHP, C++, JAVA, VB, VC, OCP प्रमाण धारण केलेले असणे आवश्यक आहे. तसेच सनदी लेखापाल इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड कडून सहयोगी ( CA ) प्रमाणित असावे तसेच कायदा अधिकारी पदांकरिता कायघातिल मान्यताप्राप्त विघापिठातून पदवी किंवा त्याचा समतुल्य पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण, तसेच ट्रेझरी मॅनेजर पदांकरीता मान्यताप्राप्त विघापीठ/ संस्थामधून चार्टर्ड अकाऊंटंट किंवा फायनान्स मध्ये एमबीए केलेले असावे तसेच कुशी अधिकारी पदांकरीत कुशी/ फलोत्पादन/ डेअरी शाखेतून पदवी किंवा पशुसंवर्धन/ वनीकरण/ पशुववैघकिय विज्ञान/ कुशी अभियांत्रिका/ मत्स्यपालन शाखेतून मान्यताप्राप्त विघापिठातून/ संस्थेतून किमान 50% गुणांसह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक. 


* वरिष्ठ व्यवस्थापक ( ऑफिसर स्केल - ||| ) - उमेदवार मान्यताप्राप्त विघापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण किंवा त्याचा समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच बँकिंग, फायनॅन्स, मार्केटिंग मध्ये पदवी/डिप्लोमा असणे, कुशी, फलोत्पादन, वनीकरण, पशुसंवर्धन, पशुवैघकिय विज्ञान, कुशी अभियांत्रिका, मत्स्यपालन, कुशी पणन आणि सहकार, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कायदा, अर्थशास्त्र आणि अकाऊंटन्सी शाखेतून पदवी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना प्राधान्य. 


* परीक्षा शुल्क - खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी 850/- रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी 175/- रुपये आहे. 


* अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 जून 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. 


अधिक माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा. 

जाहिरात पहा 


             

No comments:

Post a Comment